सांगली: दोन मुलीसह पत्नी गायब होण्याला जबाबदार असल्याच्या संशयावरून जावयाने सासूवर ब्लेडने हल्ला करून जखमी करण्याची घटना शिराळा येथे घडली. या प्रकारानंतर जावई पळून गेला असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रवीण आढाव (रा.अंत्री बुद्रुक ता. शिराळा) याची पत्नी स्वप्ना आढाव या दोन मुलींसह गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता आहेत. त्याची सासू शिराळा येथे वास्तव्यास असून मंगळवारी आढाव हा सासूच्या घरी गेला. त्याने माझी पत्नी बेपत्ता असून तिचा ठावठिकाणा सांग, तूच याला कारणीभूत आहेस असे म्हणून वाद घातला.
हेही वाचा… नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार; विश्वस्त सुशीलकुमारांचे मौन
यावेळी त्याने सोबत आणलेल्या ब्लेडने सासू जया गायकवाड यांच्या हातावर वार केले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आढाव पळून गेला. श्रीमती गायकवाड यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले असून या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.