दिगंबर शिंदे, प्रदीप नणंदकर

सांगली, लातूर : अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घट यामुळे बाजारात शाळू ज्वारीची टंचाई निर्माण झाली असून दरही शतकाकडे वेगाने झेपावत आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो ज्वारीला ८५ रुपये मोजावे लागत आहेत.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
explosion in bhugaon steel company in wardha
Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!

गेल्या वर्षी रब्बी हंगामात घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ज्वारीचा भाव तीन ते साडेतीन हजार रुपये होता, तो आता साडेसहा हजारांपासून साडेसात हजारांवर गेला आहे. स्वच्छ केलेली ज्वारी आठ हजार रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. सांगलीत एक नंबरच्या शाळूचा किरकोळ बाजारातील दर सोमवारी ८५ रुपये प्रतिकिलो होता. यामुळे गरिबाच्या ताटातील भाकरी यंदा ‘करपण्या’ची चिन्हे आहेत.

यावर्षी सुरुवातीला मोसमी पावसाने ओढ दिली. रब्बी हंगामात शाळू ज्वारी हे मुख्य पीक जिरायत जमिनीमध्ये घेतले जाते. पेरणीच्या हंगामात अपुरा पाऊस झाला. तरी चांगला पाऊस पडेल या आशेवर काही जणांनी पेरणी केली. मात्र दिवाळीत अवकाळी पाऊस पडेपर्यंत पावसाने ओढ दिली. यामुळे कोवळे पीक करपून गेले. परतीच्या पावसाची वाट पाहत पेरणीही काही ठिकाणी झाली नाही. सांगली जिल्ह्यात रब्बी ज्वारीची २० टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नसल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> अधिवेशनात धानाला बोनस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन; भंडाऱ्यात ‘शासन आपल्या दारी’

शाळू पिकाला सुरुवातीच्या काळात पाऊस अथवा रानात ओल आवश्यक असते. यानंतर केवळ थंडीच्या हवेवर शाळूचे पीक तयार होते. यंदा दिवाळी संपली तरी अद्याप थंडीचा शिरकाव झालेला नाही. यामुळे शाळूचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम म्हणून बाजारातील आवकही कमी झाली आहे.

लातूर बाजारपेठेत सोमवारी ज्वारीची आवक केवळ ५० कट्टे इतकीच असून, सात हजार एकशे रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी विकली गेल्याची माहिती अडत व्यापारी राजगोपाल बियाणी यांनी दिली. महाराष्ट्रात सोलापूर, नगर, लातूर, सांगली जिल्ह्यातील भागात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा होतो. गोकुळाष्टमीच्या आसपास ऑक्टोबरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या केल्या जातात. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाऊस होता. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या. याशिवाय सोयाबीनचा पेरा उशिरा झाल्यामुळे त्याची काढणी लांबली. त्यामुळेही रब्बी हंगामातील पेऱ्याला फटका बसला आहे.

दर चढेच राहतील

सांगली बाजार समितीमध्ये सोमवारी शाळूची आवक केवळ १५० क्विंटल होती. किमान दर ४ हजार ५०० ते कमाल दर ६ हजार ६०० रुपये असल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. तर बाजारात एक नंबरच्या शाळूचे दर क्विंटलला ८ हजारापर्यंत पोहचले असल्याचे धान्य व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले. चांगल्या प्रतीच्या शाळूचा किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो ८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर हलक्या आणि स्थानिक शाळूचा किमान दर ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. सुवर्णकार, नंद्याळ या ज्वारीचा दर तुलनेत कमी म्हणजे ४५ रुपये किलोपर्यंत आहेत असे पार्वती प्रोव्हिजनचे संचालक महेश फुटाणे यांनी सांगितले. लागवड आणि उत्पादनातील अशी दुहेरी घट यामुळे शाळूचे दर यंदा चढेच राहतील असा अंदाज आहे.

कमी पावसाचा फटका

पशुधनात घट झाल्यामुळे ज्वारीच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. त्याऐवजी हरभरा पेरणीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. यंदा पावसाने लवकर माघार घेतल्याने रब्बीच्या पेरणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे तेच शेतकरी रब्बी हंगाम घेत आहेत.