कैरी हा जवळपास सर्वांचा आवडता पदार्थ. कैरी आवडत नाही अशी व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही. उन्हाळ्यात कैरी सहज उपलब्ध होते. अशावेळी प्रत्येक घरात कैरीचं लोणचं, कैरीच पन्हे, कैरीचा छुंदा, कैरीची चटणी असे पदार्थ हमखास तयार केले जातात. तुम्हाला या उन्हाळ्यात कैरीचा आणखी एक वेगळा पदार्थ खायला आवडेल का? होय! मग तुम्ही कैरीचा पुलाव एकदा नक्की तयार करुन पाहा. आज आम्ही तुम्हाला कैरीचा पुलाव कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.
गुढीपाडव्यासाठी खास श्रीखंड पुरीचा बेत आखताय? जाणून घ्या रेसिपी
कैरीचा पुलाव कसा तयार करावा?
साहित्य : २ वाट्या दिल्ली राईस, अर्धी कटी पंढरपुरी डाळ, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे, ८-१० मिरच्यांचे तुकडे, ८-१० कडुलिंबाची पाने, २ चमचे वाटलेली मोहरी, १ चमचा कैरीचा कीस, २ चमचे मीठ, ४ चमचे तेलाची फोडणी साहित्य
कृती : प्रथम फोडणी करून ठेवा. फोडणीत हिंग, मोहरी, हळद घाला. चांगले परतून घ्या हे सर्व मिश्रण पूर्ण गार करा. कूकरमध्ये मऊ मोकळा भात करून घ्या व एका परातीत उपसून भारा गार करून घ्या. कैरीचा कीस व वाटलेली मोहरी चांगली कालवून घ्या. ती कैरी आणि मीठ भाताला लावून घ्या. तळून ठेवलेली डाळ, दाणे व इतर सर्व साहित्य भातावर घालून कालवा.
वि. सू. : हा भात मधल्या वेळेला उन्हाळ्यात कोणी येणार असेल तर त्यांना जरूर द्यावा, हा भात ४ माणसांना पोटभर होतो.