सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेले दहा-अकरा दिवस उघडीप दिल्यानंतर पावसाने पुन्हा काही भागात हजेरी लावली. दुसरीकडे खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत सुमारे ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचा पेरा जास्त म्हणजे सरासरीच्या १३७ टक्के एवढा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात गेल्या १३ जूनपासून पावसाने दडी मारली होती. दरम्यानच्या काळात पडलेला पाऊस हलक्या स्वरूपाचा होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पेरण्यांना वेगाने सुरूवात झाली. जिल्ह्यात चालू जून महिन्यातील पावसाची सरासरी १०२.५ मिलीमीटर आहे. प्रत्यक्षात २२४.४ मिमी पाऊस झाला असून त्याची टक्केवारी २१८.९ एवढी आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत बार्शीत ३३.२ मिमी पाऊस झाला. तर माढ्यातही ३४.४ मिमी इतका पाऊस बरसला. करमाळा-८.७, उत्तर सोलापूर-७.९, मोहोळ-७.९, अक्कलकोट-६.४ याप्रमाणे पावसाने हजेरी लावली. मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, दक्षिण सोलापूर या भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र आतापर्यंत सर्वाधिक २८७.७ मिमी (३१५.८ टक्के) पाऊस मोहोळ तालुक्यात तर त्यानंतर करमाळ्यात २८६.६ (२८८.९ टक्के) पाऊस पडला आहे. माढा-२८५ (२९१.८ टक्के), बार्शी-२७४.५ (२५५.८ टक्के), उत्तर सोलापूर-२३०.६ (१९९ टक्के), पंढरपूर-२२७.३ (२१८.६ टक्के), सांगोला-२१४.४ (२१०.७ टक्के), अक्कलकोट-१६९ (१६५.७ टक्के), दक्षिण सोलापूर-१६५.३ (१८२ टक्के), मंगळवेढा-१६२ (१८१ टक्के) आणि माळशिरस-१६०.१ (१४१.७ टक्के) याप्रमाणे एकूण झालेल्या पावसाची नोंद आहे.

हेही वाचा >>>“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान

खरीप पिकांसाठी पोषक वातावरण आसल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्याची लगबग वाढली असून बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट परिसरात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. विशेषतः बार्शीत ४१ हजार ७९६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र ४७ हजार ६७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६४ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला आहे. उडीद (७४.४६ टक्के),  मका (६९.७६ टक्के), तूर (३७.०४ टक्के), बाजरी (२७.३७ टक्के) आदी पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात खरीप पेरण्यांचे एकूण सरासरी क्षेत्र दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी आतापर्यंत ५९.७९ टक्के म्हणजे एक लाख ७३ हजार १४५.६ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sowing up to 60 percent due to rains in solapur amy
Show comments