राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला बसून राज्य सरकारला त्यांचं आंदोलन गांभीर्याने घेण्यास भाग पाडलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अनेक ठिकाणी जमाव आक्रमक आंदोलनं करू लागला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला वेळ द्यावा आणि उपोषण मागे घ्यावं, असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतला. दरम्यान, समाजवादी पार्टीला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे सपा आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

अबू आझमी म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीसाठी समाजवादी पार्टीला बोलावलं नाही. ज्या लोकांनी एकाच वेळी मराठा आणि मुस्लीम आरक्षण मंजूर केलं होतं त्या लोकांना मला विचारायचं आहे की, तुम्हाला मुस्लिमांची केवळ मतं हवी आहेत का? जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत आहेत. त्यांना विचारायचं आहे की तुम्ही मुस्लीम आरक्षणावर चर्चा करणार आहात का?

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Manoj Jarange influence is likely to benefit the state including Marathwada
माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता
assembly elections 2024 Sc reservation Subclassification Grand Alliance Mahavikas Aghadi voting  print politics news
अनुसूचित जातीच्या मतांचे ध्रुवीकरण? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा फटका
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
Manoj Jarange Patil, Maratha Andolan,
जरांगेची मतपेढी अपक्षांच्या पाठीशी ?
republican factions mahavikas aghadi
‘मविआ’ला साथ देण्याचा रिपब्लिकन गटांचा निर्धार

मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी म्हणाले, मराठा समाजासह मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं होतं. परंतु, ते आरक्षण टिकू शकलं नाही. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय निघाला आहे. त्यामुळे आता मुस्लीम समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे. आतापर्यंत सरकारने नेमलेल्या अनेक समित्यांनी मुस्लीम आरक्षणाबद्दल मुद्दे मांडले होते. त्यानंतर देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुस्लीम समाजाला आरक्षण मिळालं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे.

अबू आझमी यांचं राज्यातल्या मुसलमानांना आवाहन

सपा आमदार म्हणाले, जे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात. त्यांना केवळ मुसलमानांची मतं हवी आहेत. मुस्लीम समाज सरकारी लाभांपासून वंचित आहे. अनेक ठिकाणी मुस्लीम समुदाय हा दलित आणि आदिवासींपेक्षा मागास आहे. त्यामुळे त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. तरीदेखील सरकारने मुस्लीम समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी तमाम मुस्लीम लोकांना आवाहन करतो की त्यांनी या सगळ्या पक्षांवर बहिष्कार घालावा. हे लोक तुम्हाला आरक्षणाच्या नावाखाली मुर्ख बनवतात, केवळ मतांसाठी तुमचा वापर करतात.