पंढरपूर : येथील पालिकेने चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली. नदीपात्रात जवळपास फाटकी कपडे, निर्माल्य आदी जवळपास ४० टन कचरा गोळा करण्यात आला आहे. या कामी जेसीबी, ४० कर्मचार्यांच्या माध्यमातून हि स्वच्छता मोहीम राबवली आहे. यात्रा कावधीत जादा कर्मचारी नेमून स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> “…तर भाजपाची काय औकात होती?”, शिंदे गटाच्या नेत्याची अनिल बोंडेंवर सडकून टीका!
येथील चंद्रभागा नदीचे स्नान वारकरी भाविकांना पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. मात्र पंढरीत येणारे भाविक नदीत स्नान केल्या नंतर कपडे, निर्माल्य आदी वस्तू नदीपात्रात, वाळवंटात सोडतात. यात्रा कालावधीत नदी पात्रात पाणी सोडलेले असल्याने काही वस्तू वाहून जातात.तर काही वस्तू पात्रातच राहतात. त्यामुळे नदीपातर स्वच्छ करण्याचे काम प्रशासनाला करावे लागते.आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य , कपडे, कचरा नदीपात्रात दिसून येत असल्याने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांबरोबर जेसीबी, डंपरच्या सहाय्याने नदी पात्रातील निर्माल्य बाहेर काढले जात आहे.