निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येत्या रविवारी, ९ मार्च रोजी दिवसभर जिल्ह्य़ात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या विधानसभा मतदारसंघांमधील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी संबंधित केंद्राचे अधिकारी या दिवशी उपस्थित राहून नवीन मतदान नोंदणीचे अर्ज स्वीकारणार आहेत.
१ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वष्रे पूर्ण झालेल्या, पण मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या मतदारांनी वय व निवासाचा पुरावा, पासपोर्टसाइज रंगीत छायाचित्रासह अर्ज भरून या अधिकाऱ्यांकडे द्यावयाचे आहेत. तसेच मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी पासपोर्टसाइज छायाचित्र या अधिकाऱ्यांकडे द्यावयाचे आहे. मतदार यादीत नाव तपासण्यासाठी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे यादी उपलब्ध राहणार आहे. जिल्ह्य़ातील नवमतदारांनी या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन मतदार यादीत नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले आहे.
मतदार नोंदणीसाठी ९ मार्चला विशेष मोहीम
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येत्या रविवारी, ९ मार्च रोजी दिवसभर जिल्ह्य़ात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-03-2014 at 12:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special campaign on march 9 for voter registration