कोणताही ऋतू असूदेत महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखराकडे राज्यासह देशभरातील पर्यटकांचा कायमच ओढा असतो. महाराष्ट्रातील हे सर्वात उंच शिखर सर करणं अनेक पर्यटकांचं स्वप्न असतं. पण, समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी ३ तासांचा खडतर ट्रेक करावा लागतो. अनेक ठिकाणी थांबत चहा, पाणी, लिंबू सरबत किंवा खाद्य पदार्थ घेत तहान-भूक शमवावी लागते. अहमदनगर जिल्ह्यातील बारी आणि जहांगीरवाडी गावची आदिवासी कुटुंबं पर्यटकांना याच खाद्यपदार्थांची विक्री करत उपजीविका करतात. मात्र, यावरच वनविभागाने गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.
व्हिडीओ पाहा :
असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताचा यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा…