राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे १८ व १९ एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत असून श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी त्यांचे भाषण होणार आहे. जिल्हा व शहर संघाच्या वतीने पंचवटीतील निमाणी बस स्थानकाशेजारील आर. पी. विद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता भागवत यांच्या भाषणाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी श्रीगुरुजी रुग्णालयाच्या वास्तूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या आवारातच आनंदवली रस्त्यालगत सुमारे ८० खाटांचे अद्ययावत असे हे रुग्णालय आहे. १९ एप्रिलला सकाळी नऊ वाजता गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमासही ते उपस्थित राहाणार आहेत.

Story img Loader