“राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट का पडली? राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचे कारण काय? तर अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढं आणलं आणि नंतर वरिष्ठांना वाटलं की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झालं. उद्धव ठाकरेंना वाटलं, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढं आणलं पाहीजे. त्याच अनुषंगाने त्यांनी राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी त्यांनी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारलं. त्यामुळं त्यांच्या पक्षात फूट पडली”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. “काँग्रेस न होती तो क्या होता”, या पुस्तकाचे प्रकाशन आज फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in