नापिकी,कर्जबाजारी व तोट्यात गेलेल्या शेती व्यवसायाला कंटाळून नांदेडमधील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पतीच्या दुर्देवी मृत्यूनंतर न डगमगता विधवा पत्नीनं दहावीची परीक्षा देत नवा आदर्श समोर ठेवला आहे. आम्ही हरलेलो नाही, आमची जिद्द कायम आहे असे म्हणत शेतकऱ्यांच्या पत्नीनं दहावीची परीक्षा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी सुनिता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे या तीन महिलांनी दहावीची परीक्षा दिली. माध्यमिक शालान्त परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेस राज्यात प्रारंभ झाला आहे. दहावीच्या परीक्षेस नांदेड जिल्ह्यातील १५७ परीक्षा केंद्रांवर सुरूवात झाली असून तब्बल ४७ हजार ६७ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in