SSC HSC Exam 2025 caste category on hall Ticket : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा आता सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं हॉल तिकीट (प्रवेशिका) शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. विद्यार्थी अथवा त्यांच्या शाळा संकेतस्थळावरून हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेऊ शकतात. परंतु, हे हॉल तिकीट पाहून एकच गोंधळ उडाला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर कास्ट कॅटेगरी (जात प्रवर्गाची श्रेणी) नमूद करण्यात आली आहे. हे पाहून शिक्षण तज्ज्ञ व शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून विरोधक शिक्षण मंडळावर टीका करत आहेत. दरम्यान, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर जात नव्हे तर जात प्रवर्गाचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा उल्लेख केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा