महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान आज (१६ जुलै) १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे.

२९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान शासनाने १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २८ मे रोजी १० वीसाटी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आलं. त्यामध्ये ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुली आहेत. त्यानंतर आता शुक्रवारी हा निकाल १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

इथे पाहा निकाल

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.

– त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc result 2021 how to check results online on official website abn