महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (७ जून) जाहीर होणार असून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. शाळांमध्ये १५ जूनला गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. गुणपत्रक मिळाल्यानंतर २५ जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ७ जूनपासून अर्ज करता येणार असून २७ जून अंतिम मुदत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी २५ जूनपर्यंत अर्ज भरायचे आहेत.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी राज्यभरातून १७ लाख ४० हजार २९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

निकाल येथे उपलब्ध
http://mahresult.nic.in
http://www.msbshse.ac.in
http://www.mh-ssc.ac.in
http://www.sscresult.mkcl.org
http://www.rediff.com/exams
या शिवाय बीएसएनएल मोबाइल धारकांना एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी MHSSC  स्पेस आणि परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवायचा आहे.