राजगोपाल मयेकर

मौजे दापोलीत आज दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन चालक वाहकांसह १५ जण जखमी झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र गणेशोत्सवाला एक आठवडा असतानाच हा अपघात झाल्याने एसटी प्रवाशाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
mumbai best bus accident
Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक

दरम्यान, यातील किरकोळ जखमी प्रवाशी बसमधून बाहेर पडत तेथून निघून गेल्याने जखमींचा नेमका आकडा पुढे येऊ शकलेला नाही. या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने दापोलीतील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीवली माटवण मार्गे दापोली एसटी शहरात येत असताना हा अपघात झाला. त्याचवेळी दापोली-मुरादपूर ही बस दापोली आगारातून मंडणगडातील मुरादपूरच्या दिशेने आपल्या मार्गिकेतून चालली होती. मौजे दापोली फाट्यानजिकच्या वळणावर बोरीवली दापोली बस चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची बस दापोली मुरादपूर बसवर येऊन धडकली. दापोलीच्या शाळांमध्ये येणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी बहुसंख्येने सकाळच्या बोरीवली-दापोली बसमधून प्रवास करतात. साहजिकच अपघातात अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला. पण अपघात झाल्यानंतर अनेकांनी बसमधून बाहेर पडत शाळेची वाट धरली.

या अपघातात सौमित आयरे (१६, ), ओंकार सकपाळ (१६), सिया आयरे (१६), सुहानी तांबे (१६, सर्व रा. मौजे दापोली), अक्षय दळवी (१७, करंजाणी), अनुसूया शिरवणकर (६७, बोंडीवली), कमलाकर घडसे (४७, मुरूड), रमाकांत कालेकर (५५, करंजाणी), विशाखा मस्के (२९, पाचवली) आणि सुविधा रेवाळे (वय ४५, सुकोंडी) हे बोरीवली दापोली गाडीतील प्रवासी, तर दापोली मुरादपूर बसमधील बादीशअली चाफेकर (२९, दाभट) आदी प्रवासी जखमी झाले आहे‌त. दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांनाही अपघातात दुखापत झाली आहे‌. यामध्ये बोरीवली दापोली बसमधील चालक अंकुश भांडे व वाहक अंकुश ठाणगे तसेच दापोली-मुरादपूर बसचे चालक चंद्रकांत हांडे, वाहक नीलेश इंदुलकर यांचा समावेश आहे. सर्व जखमींना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader