राजगोपाल मयेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मौजे दापोलीत आज दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन चालक वाहकांसह १५ जण जखमी झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र गणेशोत्सवाला एक आठवडा असतानाच हा अपघात झाल्याने एसटी प्रवाशाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, यातील किरकोळ जखमी प्रवाशी बसमधून बाहेर पडत तेथून निघून गेल्याने जखमींचा नेमका आकडा पुढे येऊ शकलेला नाही. या प्रवाशांमध्ये प्रामुख्याने दापोलीतील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीवली माटवण मार्गे दापोली एसटी शहरात येत असताना हा अपघात झाला. त्याचवेळी दापोली-मुरादपूर ही बस दापोली आगारातून मंडणगडातील मुरादपूरच्या दिशेने आपल्या मार्गिकेतून चालली होती. मौजे दापोली फाट्यानजिकच्या वळणावर बोरीवली दापोली बस चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची बस दापोली मुरादपूर बसवर येऊन धडकली. दापोलीच्या शाळांमध्ये येणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी बहुसंख्येने सकाळच्या बोरीवली-दापोली बसमधून प्रवास करतात. साहजिकच अपघातात अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला. पण अपघात झाल्यानंतर अनेकांनी बसमधून बाहेर पडत शाळेची वाट धरली.
या अपघातात सौमित आयरे (१६, ), ओंकार सकपाळ (१६), सिया आयरे (१६), सुहानी तांबे (१६, सर्व रा. मौजे दापोली), अक्षय दळवी (१७, करंजाणी), अनुसूया शिरवणकर (६७, बोंडीवली), कमलाकर घडसे (४७, मुरूड), रमाकांत कालेकर (५५, करंजाणी), विशाखा मस्के (२९, पाचवली) आणि सुविधा रेवाळे (वय ४५, सुकोंडी) हे बोरीवली दापोली गाडीतील प्रवासी, तर दापोली मुरादपूर बसमधील बादीशअली चाफेकर (२९, दाभट) आदी प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांनाही अपघातात दुखापत झाली आहे. यामध्ये बोरीवली दापोली बसमधील चालक अंकुश भांडे व वाहक अंकुश ठाणगे तसेच दापोली-मुरादपूर बसचे चालक चंद्रकांत हांडे, वाहक नीलेश इंदुलकर यांचा समावेश आहे. सर्व जखमींना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.