रायगड : जवळ आलेल्या गणेशोत्सवामुळे गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घ्या”; राणेंच्या विधानानंतर आव्हाडांचं खुलं आव्हान, म्हणाले, “हिंमत असेल तर…”

एसटी बस मुंबई राजापूरकडे ( MH 14 BT 2664 ) जाणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही . अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.