सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत आणि मुका मार लागला आहे. या अपघातानंतरचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस सोलापूरहून लातूरच्या दिशेनं जात होती. दरम्यान, सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील कासेगाव जवळ हा अपघात झाला. चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने एसटी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली आहे. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकांनी दिसेल त्या मार्गाने बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

अपघातग्रस्त एसटीमधील प्रवासी पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्यातील आहेत. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली असून सर्व रुग्ण शुद्धीवर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात एसटीच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus accident on solapur tuljapur road 6 passenger injured video rno news rmm
Show comments