भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाल्याच्या निषेधार्थ रविवारपासून सुरू असलेला कार्यकर्त्यांचा असंतोष आजही कायम होता. जिल्ह्यात दोन दिवसांत १९ एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली असून, सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य बस वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली होती. दगडफेकीमुळे सांगली आगाराच्या १९ बसची २ लाख रुपयांची हानी झाली असून, विविध मार्गावरील बस फे-या रद्द झाल्याने १५ लाखाचा आíथक फटका महामंडळाला बसला आहे.
डॉ. आंबेडकरांच्या आक्षेपार्ह छायाचित्रावरून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी जोरदार क्षोभ व्यक्त झाला. तालुक्याच्या ठिकाणासह सांगली, मिरजेत निषेध फे-या काढून समाजकंटकांचा तीव्र धिक्कार करण्यात आला. रविवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी ८ बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर हे सत्र सोमवारीही सुरू होते. मिरज तालुक्यातील शिपूर, नरवाड, लक्ष्मीवाडी या ग्रामीण भागात जाणा-या शहरी बसेसवर दगडफेक करण्यात आली. सांगलीतील कोल्हापूर रोडवर असणा-या आकाशवाणीजवळ आणि शासकीय रुग्णालयानजीक बसवर दगडफेक करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत १९ एसटी बसेसवर विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीमुळे १ लाख ९४ हजार रुपयांची वित्त हानी झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रण कार्यालयातून देण्यात आली. याशिवाय सांगलीहून कोल्हापूर, इचलकरंजी व सोलापूर मार्गावरील बस वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. जत, इस्लामपूर, पलूस, तासगाव या मार्गावरील बस वाहतूक अंशत: सुरू होती.
कर्नाटकातील कागवाड या ठिकाणी सोमवारी बंद पाळण्यात आला. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. कर्नाटकात जाणा-या महाराष्ट्राच्या २० फे-या तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणा-या १५४ फे-या सोमवारी बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती मिरज आगारप्रमुख आर. एम. फलवर यांनी दिली. याशिवाय ग्रामीण भागातील शहरी बसेसच्या ८ आणि ग्रामीण बसेसच्या ८ अशा १६ मुक्काम फे-या बंद करण्यात आल्या. विविध मार्गावरील बस वाहतूक बंदमुळे अनियमित झाल्याने एसटीच्या सांगली विभागाला १५ लाख रुपयांचा आíथक तोटा बसला असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा