कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी (१० जानेवारी) आंदोलनात सहभागी एका एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली. याशिवाय अन्य एका घटनेत कळंबा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन कैद्याचा देखील हृदयविकाराने मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याप्रमाणेच कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज याबाबत मुंबईत बैठक होती. आंदोलनात सहभागी एसटी कर्मचारी शरणाप्पा मल्लाप्पा गुंजाळे (वय ३१, रा. अक्कलकोट) हे सायंकाळी इचलकरंजी आगारात या बैठकीची बातमी मोबाईलवर पाहत होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

“सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याची मागणी”

शरणाप्पा गुंजाळे यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

हेही वाचा : “एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत परिवहन मंत्री अनिल परबांचं मोठं विधान

कळंबा कारागृहात न्यायाधीन कैद्याचाही ह्रदयविकाराने मृत्यू

दरम्यान, अन्य एका घटनेत कळंबा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंदी संजय महादेव सावंत याचा देखील हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने त्याला सीपीआर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेत जमिनीच्या वादातून धामणे (तालुका – आजरा) येथे झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात सावंत याला अटक झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus employee death by heart attack while watching protest news on mobile in kolhapur pbs
Show comments