Ambadas Danve on ST Bus Ticket Price Hike : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा फटका बसला आहे. एसटीच्या तिकीट दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला आहे. या बरोबरच राज्यभरात रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपये दरवाढ करण्यात आली आहे. तसेच रिक्षा व टॅक्सीच्या तिकीटासंदर्भातील १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे आधीच वाढत्या महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. आता एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून अनेकांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता शिवसेना ठाकरे गटानेही याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

viral video of vardha
VIDEO : आधी कानाखाली मारली अन् खाली पाडून…; राज्यात दिवसाढवळ्या तरुणीला मारहाण, कारण काय?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Manoj Jarange And Prakash Ambedkar
Manoj Jarange : “आमच्यात वर्चस्वाची लढाई वगैरे…”, प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला जरांगे पाटलांचे थेट उत्तर
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sharad pawar Health Update
Sharad Pawar Health Update : शरद पवारांची प्रकृती बिघडली, नियोजित कार्यक्रम रद्द!
ajit pawar and jitendra Awhad (2)
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या, अजित पवारांच्या नेत्याची सुपारी? जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ आकाचं नावच केलं जाहीर!
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…

अंबादास दानवे काय म्हणाले?

“तीन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे, एसटीची सेवा खूप चांगली सुरु आहे. अशा प्रकारची घोषणा केली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात एसटीचा २ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार आम्ही समोर आणण्याचं काम केलं. ज्या पद्धतीने खासगी बसेस चालतात. आधीची बस ४४ रुपये प्रति किलोमीटर ते ही डिझेलवर चालते. मग सरकारने एक नवीन करार केला होता, त्यामध्ये ३५ रुपये प्रति किलोमीटर विना डिझेल, १ हजार ३१० बसेस घेतल्या जात होत्या. मात्र, त्यानंतर आम्ही आवाज उठवला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रक्रिया थांबवली. याचा अर्थ एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि दुसरीकडे एसटी बस तोट्यात गेली असं सांगितलं जातं. अशा परिस्थितीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. शिवसेना या विषयी आंदोलन करणार आहे”, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून नागरिकांवर विविध सवलतींची खैरात झाली होती. मात्र, नवे सरकार स्थापन होताच नागरिकांना दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली. ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू झाली, तर रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यामध्ये १ फेब्रुवारीपासून वाढ केली जाईल. एसटीची भाडेवाढ यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये, तर रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ सप्टेंबर २०२२ मध्ये करण्यात आली होती. परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत दरवाढीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Story img Loader