सोलापूर : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या बसला माळशिरस तालुक्यात वटपळी गावाजवळ अपघात होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. तर अन्य दुसऱ्या शिक्षकासह पाच विद्यार्थी जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गणपती पुळे येथे गेली होती. तेथून गावी परत येताना वाटेत माळशिरसपासून पाच किलो मीटर अंतरावर वटपळी गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर मालमोटारीवर सहलीची एसटी बस (एमएच १४ बीटी ४७०७) जोरात आदळली.

हेही वाचा – उत्तर महाराष्ट्र, विदर्भात गारठा कायम; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात वाढीचा अंदाज

हेही वाचा – पाच रुपयांचे दूध अनुदान अडकणार नियमांच्या चौकटीत; ई-केवायसी बंधनकारक, खासगी संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान नाही

या अपघातात एसटी बसमधील एका शिक्षकाला जीव गमवावा लागला. तर अन्य एका शिक्षकासह पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना अकलूजमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहलीत ४० विद्यार्थी होते. त्यांच्यासोबत दोन शिक्षक आणि दोन शिक्षिका होत्या. अपघातात एसटी बसच्या समोरचा भाग चेमटला गेला. माळशिरस पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus on educational trip accident near vatpali village the teacher died on the spot ssb
Show comments