ग्रामीण भागातील महत्त्वाच्या गावांना, तालुक्यांना जोडणारी एसटी बस सेवा सुरू उद्या (दि १५) पासून करण्यात येणार आहे. अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी पुन्हा पोचविण्याचा निर्णय सातारा विभागीय कार्यालयाने घेतला आहे. तालुक्यांच्या ठिकाणांवरून महत्त्वाच्या गावांमध्ये बस सेवा पोहचविण्याचे नियोजन केले जात आहे.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून २३ मार्चपासून एसटी बससेवा देखील बंद होती. या अगोदर कधीच एवढ्या दीर्घकाळ एसटीची चाके कधी थांबलेली नव्हती. एसटी बस आली नाही किंवा बस बंद असली की गावात सर्वत्र अस्वस्था पसरते. गावोगावी खेडोपाड्यात जाणारी एसटी आतापर्यंत बंद होती. चौथ्या टप्प्यात एसटीला जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे एसटी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यामध्ये २२ मे पासून एस टी बस सुरु झाली सुरवातीच्या टप्प्यात परप्रांतीय कामगारांची वाहतूक करण्यात आली. त्यानंतर तालुका ते तालुका ठिकाणांपर्यंत जाणाऱ्या ३१ बसगाड्यांच्या १०१ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते.
प्रत्येक बसमधून २० प्रवासी प्रवास करणार आहेत. सध्या ग्रामीण भागातून तालुक्याला ग्रामस्थांना येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची कोणतीच व्यवस्था नाही. करोनाच्या भीतीने २२ मे पासून एसटी वाहतुकीला मोठा प्रतिसाद मिळू शकला नाही. सरासरी १५ ते १६ प्रवासी घेऊन दोनदोन तास थांबून एसटी धावली . त्यामुळे आता ग्रामीण भागातील महत्त्वाच्या फलटण – लोणंद, लोणंद – वाई, कऱ्हाड – ढेबेवाडी, कऱ्हाड – मसुर अशा स्वरूपाच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर असलेल्या आगारांना त्यांच्या नफ्यामध्ये असणाऱ्या मार्गांची माहिती मागविण्यात आली आहे. सोमवारपर्यंत विभागीय कार्यालयातून गाड्यांच्या मार्गाचे नियोजन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सध्या ३१ गाड्यांवरून ५० गाड्यांपर्यंत संख्या नेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून येणारा प्रतिसाद पाहून पुढील १५ दिवसांमध्ये ही संख्या १०० गाड्यांपर्यंत नेण्याचा विचार महामंडळाकडून सुरू असल्याची माहिती एसटी महामंडाळाकडून देण्यात आली. एसटीची पर जिल्ह्यात तसेच आंतरजिल्हा वाहतूक पूर्णतः बंद आहे. त्यामळे सुमारे एक कोटी ३१ लाख दहा हजार ७० किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे एसटीचे ३६ कोटी ५८ लाख आठ हजार रुपयांचा महसूल बुडाला आहे.