सातारा: पुणे बंगळूर महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिलेली आहे मध्यरात्री कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांच्या सुमारे पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान भुईंज पोलिस निरीक्षक रमेश गर्जे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बसेस पुढील दिशेने मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवाळला. आनेवाडी टोल नाक्यावरील सर्व लेनवर एसटी बसेस अडवण्यात आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला. हजारो वाहने मध्यरात्री पुणे सातारा मार्गीकेवर अडकून पडली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या कोकणवासीयांची मोठी गडबड सुरू आहे. कोकणात गणेशोत्सवासासाठी जाणार्‍या कार, जीप, एसटी बसेस तसेच इतर वाहनांसाठी महामार्गावरील सर्वच टोलमधून राज्य शासनाकडून सूट देण्यात आली आहे. मध्यरात्री ते दोन च्या सुमारास आनेवाडी टोल नाक्यावर एकच गोंधळ उडाला. मुंबई, पुण्याच्या बाजूकडून आलेल्या एस.टी. बसेस कोल्हापूर, कराडवरून खाली कोकणाच्या दिशेने जाणार होत्या. या बसेस आनेवाडी टोल नाक्यावर रात्री आल्या. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी चालकांकडे टोलची मागणी केली. त्यावर वाहक व चालकांनी कोकणात जाणार्‍या या बसेस असून टोलमाफी असल्याचे सांगितले. मात्र टोल प्रशासनाने शासनाकडून आम्हाला कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगून टोल घेतल्याशिवाय जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूनी कडक भूमिका गेतलयाने काळोख्या रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

हेही वाचा : Ganesh Festival 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला स्वत:च्या आवाजातला व्हिडीओ, गणेशोत्सवाच्या देशवासीयांना दिल्या शुभेच्छा!

टोलनाक्यावरील सर्वच लेनवर एसटी बसेस थांबल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे अन्य वाहने अडकून पडल्याने महामार्गावर कोंडी झाली. अन्य वाहन चालक व प्रवाशांनींही संताप व्यक्त केला. यामुळे एसटीतील गणेशभक्त व प्रवाशांनी तर आक्रमक होवून वाद घालायला सुरुवात केली. या वादावादीमुळे तणावात भर पडली. एकच गोंधळ उडाला. कोण कुणाचे ऐकत नव्हता. हमरीतुमरीने गोंधळ उडाला. हे प्रकरण भुईंज पोलिस ठाण्यापर्यंत गेले.वाढत जाणारा तणाव, महामार्गावरील कोंडी यामुळे पोलिसांनी तातडीने मार्ग काढला. टोल प्रशासनाला टोल न घेताच एसटी बसेस सोडून देणे भाग पडले. त्यानंतर या बसेस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या.

Story img Loader