सातारा: पुणे बंगळूर महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिलेली आहे मध्यरात्री कोकणात जाणार्या गणेश भक्तांच्या सुमारे पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान भुईंज पोलिस निरीक्षक रमेश गर्जे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बसेस पुढील दिशेने मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवाळला. आनेवाडी टोल नाक्यावरील सर्व लेनवर एसटी बसेस अडवण्यात आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला. हजारो वाहने मध्यरात्री पुणे सातारा मार्गीकेवर अडकून पडली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in