सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी बसना राज्य शासनाने पथकरात सवलत दिलेली आहे. मध्यरात्री कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सुमारे पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी पथकर देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, भुईंज पोलीस निरीक्षक रमेश गर्जे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बस मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवळला. आनेवाडी टोलनाक्यावरील सर्व मार्गिकेवर एसटी बस अडवण्यात आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला. शेकडो वाहने मध्यरात्री पुणे-सातारा मार्गिकेवर अडकून पडली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा