महाराष्ट्राच्या संतपरंपरेवर आधारित ‘रंगी रंगला रे श्रीरंग’ या नावाने महानाटय़ाची निर्मिती सावंतवाडीत करण्यात आली आहे. या महानाटय़ासाठी चार हजार स्क्वेअर फूटचा ३० फूट उंचीचा तीन मजली रंगमंच तयार करण्यात येत असून, सुमारे शंभर तंत्रज्ञ व कलाकार पडद्यामागची जबाबदारी सांभाळणार आहेत. हे महानाटय़ जिमखाना मैदानावर १२ ते १६ डिसेंबर या कालावधीत सादर केले जाणार आहे.
ज्ञानेश्वर कला, संस्कृती, क्रीडा मंडळ नेरुर व परमेश्वर सावंतवाडी यांच्या संयुक् विद्यमाने ‘रंगी रंगला रे श्रीरंग’ या नावाने महानाटय़ाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘रंगी रंगला रे श्रीरंग’ची संकल्पना, लेखक, कार्यकारी निर्माता तथा दिग्दर्शक बाळ पुराणिक आहेत. संगीत दिग्दर्शक स्वप्निल गोरे, पाश्र्वसंगीत अमित पाध्ये (मुंबई), नेपथ्य संकल्पना क्षितिज इव्हेंट- सावंतवाडी, कला दिग्दर्शक विवेक आंबिये, केदार कलबर्गी, प्रसाद कामत, ट्रिकसीन नगरसेवक संजय पेडणेकर आहेत.
क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी ही माहिती दिली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सचिव लक्ष्मण नाईक, सहसचिव सिद्धेश नेरुरकर, हर्षवर्धन धारणकर, प्रभाकर सावंत, मनोज नाईक, श्री पुराणिक, संतोष गावडे आदी उपस्थित होते.
क्षितिज इव्हेंट सतत सांस्कृतिक उपक्रम घेत आहे. सावंतवाडीत नाटय़कला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. समाजप्रबोधनासोबत विद्यार्थीवर्गापासून सर्व युवा पिढीला संतपरंपरा समजावी म्हणूनच या महानाटय़ाची निर्मिती केल्याचे बाळ पुराणिक म्हणाले.
या महानाटय़ात ज्ञानेश्वरांचे रेडय़ामुखी वेद वदविणे, चांगदेव भेटीसाठी भिंत चालविणे, बाल नामदेवासाठी विठ्ठलमूर्ती सजीव होणे, गोरा कुंभाराच्या पायी मातीत मूल तुडविले जाणे, शिवाजी महाराज व तुकाराम भेट, तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन इत्यादी ट्रिकसीनयुक्त प्रसंग, रंगमंचावर प्रत्यक्ष घोडे, बैलगाडय़ा आदींचा वावर, तसेच १५० कलाकारांचा महानाटय़ात सहभाग असेल, असे बाळ पुराणिक म्हणाले. या महानाटय़ात उत्तम अभिनयाबरोबरच संतांच्या काळानुरूप वेशभूषा, रंगभूषा, दर्जेदार संगीत, पाश्र्वसंगीत या सर्वाच्या दर्जेदार साथीने संतचरित्र विद्यार्थी युवा पिढीसमोर मांडून संतांचे मोलाचे विचार आजच्या पिढीसमोर नेण्यात येणार आहेत. सावंतवाडीत महानाटय़ाची कलाकृती सावंतवाडीच्या वैभवात भर टाकेल, असा विश्वास पुराणिक यांनी व्यक्त केला.
पंढरपुरात विष्णू म्हणजेच विठोबा कसा आला आणि विटेवर उभा राहिला हे तीन तासांच्या महानाटय़ात दिसेल. १२ ते १६ डिसेंबर सायंकाळी ६ वा. जिमखाना मैदानावर महानाटय़ होईल. त्याची ऑडिशन २२ नोव्हें. रोजी सकाळी १० वा. बॅ. नाथ पै व्यासपीठावर होईल, असे बाळ पुराणिक म्हणाले.
या महानाटय़ाची निर्मिती बाळ पुराणिक यांनी केली. त्यांच्या सांस्कृतिक चळवळीला सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्यासह पुराणिक यांच्या मित्रांचे सहकार्य राहील, असे अतुल काळसेकर म्हणाले.