अलिबाग- कोकण किनारपट्टीवर सातत्याने उद्भवणाऱ्या आपत्ती लक्षात घेऊन, रायगड जिल्ह्यातील महाड येथे कायम स्वरूपी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी तैनात करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यास केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. अशातच आता महाड ऐवजी पनवेल तालुक्यातील बाम्बवी येथे नव्या बेस कॅम्प उभारणीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षात महाड परिसराला सातत्याने नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. कधी महापूर, इमारत दुर्घटना, पूल दुर्घटना, अतिवृष्टी, दरड दुर्घटना, चक्रीवादळे अशा अनेक आपत्तीचा यात समावेश होता. महाड येथील सावित्री पुल दुर्घटना या दोन्ही आपत्तीच्या वेळीही आपत्ती प्रतिसाद दलांच्या जवानांनी घटना स्थळी दाखल होण्यास बराच कालावधी लागला होता. हीबाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफचा कायम स्वरुपी बेस कॅम्प तैनात करण्यात यावा यासाठी अशी मागणी होती. राज्यसरकारने तीन वर्षापूर्वी याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवला होता. मात्र महाड येथील २.५७ हेक्टर जागाही देण्यात आली होती. मात्र तीन वर्षात याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही.

Borgaonkarwadi parking lot, Kalyan,
सव्वाकोटीचे भाडे थकविल्यामुळे कल्याणमधील बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेच्या ताब्यात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Navi Mumbai corporation new policy car Parking problem
नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन
MahaRERA action against 905 housing projects Mumbai news
१,९०५ गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची कारवाई; नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांची बॅँक खाती गोठवली
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ

हेही वाचा >>>रत्नागिरी शहरात बांगलादेशी महिला सापडली; दहशत विरोधी पथकाच्या सलग दुस-या कारवाईने खळखळ

दरम्यान महाड येथील एनडीआरएफ बेस कॅम्पची मागणी असतांनाच आता पनवेल तालुक्यातील बाम्बवी येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प तयार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. रायगड सह मुंबई आणि नवीमुंबईसाठी हा बेस कँम्प उपयुक्त असल्याने पनवेल येथील जागा निवडण्यात आली आहे. रायगडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे महाड येथील एनडीआरएफ बेस कॅम्पच्या उभारणीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

एनडीआरएफच्या अथवा एसडीआरएफ बेस कॅम्प महाड येथे व्हावा यासाठी आमचा आग्रह आहेच. कोकणातील सतत होणाऱ्या आपत्ती लक्षात घेतल्या तर महाड येथील बेस कॅम्प उपयुक्त ठरू शकेल.-आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

एनडीआरएफच्या नवीन बेस कॅम्पबाबत कुठलाही प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे आलेला नाही. महाराष्ट्र आपत्ती विकास प्राधिकरणाकडून तो राष्ट्रीय आपत्ती विकास प्राधिकरणाला गेला असेल त्याबाबत कल्पना नाही.-दीपक तिवारी, डेप्युटी कमांडट, एनडीआरएफ

Story img Loader