सरकारने आता राम मंदिराच्या निर्मितीसाठी भूमी अधिग्रहण करायला सुरुवात करुन राष्ट्राला गौरव मिळवून देण्याचे काम केले पाहिजे, असे वक्तव्य संघ प्रचारक डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला मीरा-भाईंदर येथील केशव सृष्टी येथे बुधवारी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत हेही उपस्थित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राम मंदिराचे प्रकरण हे हिंदू विरुद्ध मुस्लीम किंवा मंदिर विरुद्ध मशीद नाही. न्यायालयाने आधीच म्हटले आहे की, नमाज पठण करण्यासाठी मशीद अनिवार्य नाही. ते खुल्या जागेतही नमाज पठण करु शकतात, असे वैद्य यांनी म्हटल्याचे ‘आज तक’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

मंदिर पाडून मशीद उभारणे हे कायदेशीर काम नव्हते. राम मंदिरावर आता चर्चा करण्याची गरज नाही. जेव्हा बाबरवर विजय मिळवला होता. तेव्हा त्याच्याकडे मोठ्याप्रमाणात जमीन होती. तो कुठेही मशीद उभारु शकले असते. न्यायालयाने म्हटले आहे की, मुस्लीम प्रार्थनेसाठी मशीद महत्वाची नाही. ज्या जागेवर विजय मिळवून मशिदीची निर्मिती करण्यात आली आहे. तिथे प्रार्थना करणे योग्य नाही, असे इस्लामी विचारवंतांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी संघावर केलेल्या आरोपाप्रकरणी वैद्य म्हणाले की, संघाविरोधात खूप सारे आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे आरोप केले आहेत. ते जितके आरोप करत आहेत, तितका संघ वेगाने वाढत आहे.

संघाच्या तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अनेक मुद्यांवर विचारमंथन होणार आहे. अयोध्येतील राम मंदिर निर्मिती, देशाची सुरक्षितता, सीमा क्षेत्राचा विकास, नवीन शिक्षण निती आणि स्वदेशी वस्तुंच्या निर्मितीसह अनेक मुद्यांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला सरकार्यवाह सुरेश जोशी, सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, डॉ. कृष्ण गोपाल, दत्तात्रय होसबले, व्ही. भागय्या आदींनी भाग घेतला आहे. संघाच्या कार्यकारिणीची ही बैठक वर्षांतून दोन वेळा होते. या बैठकीत देशभरातील ३०० संघाचे सदस्य भाग घेत आहेत.