गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रदेश भाजपची बठक प्रथमच बुधवारी (दि. २) व गुरुवारी मुंबईत होणार आहे. या बठकीस आमदार पंकजा मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. त्या काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर बरोबर एक महिन्याने (३ जुल) मुंबईत भाजप प्रदेश शाखेची बठक होत आहे. बठकीला राज्यभरातील कार्यकत्रे उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मुंडे यांच्या वारस भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे उपस्थित राहणार असून त्या आपली भूमिका मांडणार आहेत. वडिलांच्या निधनानंतर प्रथमच पक्षाच्या व्यासपीठावरून त्या काय बोलतात, याची सर्वानाच उत्सुकता आहे. बठकीला जिल्हय़ातून मोठय़ा संख्येने कार्यकत्रे उपस्थित राहणार आहेत. सध्या पंकजा मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या दिवंगत मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात बसून राज्यातील लोकांना भेटत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा