शरद पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिवेशन जवळ आले, की विस्ताराची चर्चा करायची. ते संपले की चर्चा सोडून द्यायची. असा प्रकार गेली दोन वर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गेली दोन वर्षे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपली नाराजी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
थेट परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये अशा प्रकारची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे किराणा दुकानदार व छोटय़ा व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नसून उलट शेतकरी व ग्राहकांचा फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.
रंगराजन समितीबाबत ते म्हणाले की, सर्वाधिक साखर उत्पादन घेणाऱ्या ब्राझील देशाच्या धर्तीवर या अहवालातील शिफारशी आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात त्याला विरोध होत आहे. तर महाराष्ट्रात पाठिंबा मिळत आहे. यावर मतांतर असले तरी एकंदरीत शिफारशी स्वागतार्ह आहेत. ऊस दराचा प्रश्न हा साखर कारखाना व शेतकरी यांच्या पातळीवर मिटण्याची गरज आहे. याचा पुनरु च्चार करून या संदर्भात संवादाला सुरु वात होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दुधाच्या पावडरीचे दर कोसळले असल्याने त्याला ६० रु पये किलोप्रमाणे अनुदानाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दुधाच्या उपपदार्थाच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा