महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ४८वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व भारतीय एज्युकेशन विद्या संकुल यांच्या सहयोगाने ही स्पर्धा भारतीय एज्युकेशनचे परमार कॉलेज, वेलशेत- नागोठणे येथे खेळवली जाणार आहे.
पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर (५० वर्षांवरील) पुरुष व महिला एकेरी, पुरुष व महिला सांघिक अशा सहा गटांमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार आहेत. हे संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. नागोठणे येथे होणारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कॅरम स्पर्धा राज्यातील सर्व जिल्ह्य़ांसाठी खुली आहे. खेळाडूंच्या प्रवेशिका संबंधित जिल्हा संघटनेकडूनच स्वीकारण्यात येणार आहेत. रायगडव्यतिरिक्त परजिल्ह्य़ातून येणाऱ्या खेळाडूची २ नोव्हेंबरपासून निवासाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे.
पुरुष एकेरीत विजेत्यास रोख रुपये ११,०००/-, उपविजेत्यास रोख रुपये ५,०००/-, उपान्त्य उपविजेत्यास प्रत्येकी रोख रुपये २,५००/- व उपउपान्त्य फेरीतील उपविजेत्यांना प्रत्येकी रोख रुपये १,५००/-, महिला एकेरीत विजेत्यास रोख रुपये ५०००/-, उपविजेत्यास रोख रुपये ३,०००/-, उपान्त्य उपविजेत्यास प्रत्येकी रोख रुपये १,५००/- व उपउपान्त्य फेरीतील उपविजेत्यांना प्रत्येकी रोख रुपये १,०००/-. वयस्कर पुरुष एकेरीत विजेत्यास रोख रुपये ३,०००/-, उपविजेत्यास रोख रुपये २,०००/-, उपान्त्य उपविजेत्यास प्रत्येकी रोख रुपये १,५००/-. वयस्कर महिला एकेरीत विजेत्यास रोख रुपये २,०००/-, उपविजेत्यास रोख रुपये १,०००/-, उपान्त्य उपविजेत्यास प्रत्येकी रोख रुपये ५००/-. पुरुष सांघिक गटात विजेत्या संघास रोख रुपये ५,०००/-, उपविजेत्यास रोख रुपये ३,०००/-, उपान्त्य उपविजेत्यास प्रत्येकी रोख रुपये २,०००/- व उपउपान्त्य फेरीतील उपविजेत्यांना प्रत्येकी रोख रुपये १,०००/-. महिला सांघिक गटात विजेत्या संघास रोख रुपये ३,०००/-, उपविजेत्या रोख रुपये २,०००/-, उपान्त्य उपविजेत्यास प्रत्येकी रोख रुपये १,०००/- अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे उपउपान्त्य फेरीपासून व्हाइट व ब्लॉक स्लॅमला रोख रुपये २००/- बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धा व्यवस्थित पार पाडावी यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष शिवकुमार लाड, कार्याध्यक्ष आमदार रमेश पाटील, उपाध्यक्ष नथुराम पाटील, सुभाष थोरवे, मंजूर अहमद खान, प्रदीप भाटकर, रमेश पारे, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अविनाश टिळक, सहकार्यवाह जनार्दन संगम, अजित सावंत, दस्तगीर खान, संजय कदम, आनंद खरे, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, उपाध्यक्ष कृष्णकांत पारकर, हरिभाऊ साखरे, दिनेश परमार ही स्पर्धा समिती काम करीत आहे.
रायगडातील खेळाडूंचे प्रवेश अर्ज २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मघना, पेझारी, तालुका अलिबाग, परजिल्ह्य़ातील खेळाडूंचे अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद कार्यवाह अरुण केदार, प्रभादेवी, मुंबई येथे स्वीकारले जाणार आहेत.

Story img Loader