५४व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पध्रेत नांदेड केंद्रातून परभणीतील राजीव गांधी युवा फोरम या संस्थेला नाटय़निर्मितीचा पहिला, तर बालगंधर्व सांस्कृतिक कला व युवक मंडळाच्या ‘भयरात्र’ नाटकास दुसरे पारितोषिक मिळाले.
‘सहज सुचलं म्हणून’ या नाटकास पहिले पारितोषिक व प्रमाणपत्र, तसेच २० हजार रुपये जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली. नाटकाचे लेखक प्रा. रविशंकर िझगरे, तर नाटय़निर्मिती प्रथम पारितोषिक संजय पांडे यांना जाहीर झाले. विजय करभाजन (दिग्दर्शक) प्रथम पारितोषिक १० हजार रुपये व प्रमाणपत्र, सौरभ वडसकर (नेपथ्य) दुसरे पारितोषिक ३ हजार रुपये व प्रमाणपत्र, दिगंबर डिघोळकर (प्रकाश योजना) पहिले पारितोषिक ५ हजार रुपये व प्रमाणपत्र, किशोर पुराणिक (उत्कृष्ट अभिनय) रौप्यपदक व ३ हजार रुपये जाहीर झाले. नाटकात प्रा. किशोर विश्वामित्रे, विनोद डावरे, भानुदास जोशी, संचित आरळकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
परभणीच्या बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळाच्या ‘भयरात्र’ या नाटकास १५ हजार रुपयांचे दुसरे पारितोषिक व प्रमाणपत्र संजय पांडे यांना जाहीर झाले. सुनील ढवळे (दिग्दर्शन) दुसरे पारितोषिक ५ हजार रुपये व प्रमाणपत्र, अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र रवि पुराणिक यांना जाहीर झाले. या नाटकात प्रा. जयप्रकाश मगर, प्रा.अंकुश वाघमारे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
‘सहज सुचलं म्हणून’ पहिले, ‘भयरात्र’ला दुसरे पारितोषिक
हौशी मराठी नाटय़ स्पध्रेत परभणीतील राजीव गांधी युवा फोरम या संस्थेला नाटय़निर्मितीचा पहिला, तर बालगंधर्व सांस्कृतिक कला मंडळाच्या ‘भयरात्र’ नाटकास दुसरे पारितोषिक मिळाले.

First published on: 05-12-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State drama competition