विधिमंडळ अधिवेशन विशेष
राज्यात सध्या तज्ज्ञांचे पेव फुटले असून प्रति हेक्टरी जादा खर्च येतो म्हणून उपसा सिंचन योजनेला विरोध केला जात आहे. मात्र अवर्षणप्रवण भागासाठी या योजना आवश्यक असून ज्यांना राज्याचा भूगोल माहीत नाही, पाटबंधारे विभागाची माहिती नाही, तेच लोक याला विरोध करीत आहेत अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.
 दुष्काळी भागासाठी या योजना आवश्यक असून त्या योजना काही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस बंद करू देणार नाही, विदर्भ, मराठवाडय़ातील लोकांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी उपसा सिंचन योजना सुरू केल्या. युतीच्या काळातही टेंभूसारखी मोठी उपसा सिंचन योजना सुरू झाली. मग त्या वेळच्या लोकांना काही कळत नव्हते का, असा सवालही पाटील यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृष्णा खोरे प्रकल्पांना गती देऊन आंध्र आणि कर्नाटकाला जाणारे पाणी वाचविले. हा प्रकल्प राबविताना महाराष्ट्राच्या भावनिक ऐक्याला तडा जाऊ नये म्हणून विदर्भ, मराठवाडय़ातही जादा प्रकल्प घेतले. त्या प्रकल्पावरून त्यांना टार्गेट केले जात अस्ेाल तर राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नही. गडकरी, मुंडे यांनी युतीच्या काळात दाबून ठेवलेला अनुशेष समितीचा अहवाल आघाडी सरकारने बाहेर काढला आणि मागास भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे विदर्भ, मराठवाडय़ाच्या अपेक्षांवर पाणी टाकू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
अजित पवार हे राष्ट्रवादीचे शक्तिस्थळ असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड सुरू आहे. ही घोडदौड रोखण्यासाठीच पवार यांच्यावर हल्ले केले जात असून यापुढे असेच हल्ले होत राहिल्यास राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, असा इशाराही या वेळी पिचड आणि पाटील यांनी दिला.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्यपत्रिका नव्हे अर्धसत्य
विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने सत्यपत्रिका जाहीर करण्यापूर्वीच भाजपने ती फोडली आणि ही सत्यपत्रिका सत्य नसून अर्धसत्य आहे, असा आरोप  केला. जे श्वेतपत्रिकेतच नाही त्याची माहितीही या सत्यपत्रिकेत आहे. लवासाबाबत श्वेतपत्रिकेत आणि आमच्या काळ्या पत्रिकेतही अवाक्षर नसताना सत्यपत्रिकेत लवासाला पाणी देण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी एसआयटी चौकशीपासून पळ का काढीत आहेत, असा सवालही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.