MPSC New Syllabus Implementation : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करावा अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. दरम्यान, राज्य सरकारने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आश्वासन

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
tiger reserve project
विश्लेषण : सरकारला व्याघ्रप्रकल्प नको आहेत का?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

मागील अनेक दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम तत्काळ लागू करू नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वेळा आंदोनलही केले होते. दरम्यान, आज (३१ जानेवारी) पुण्यातील अलका टॉकिज येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आंदोलकांशी बातचीत करून दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत- गोपीचंद पडळकर

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी गोपीचंद पडळकर यांना उचलून घेत त्यांच्या नावाचा जयजयकार केला. सरकारच्या या निर्णयावर पडळकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आज विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या भावना सरकारने ऐकल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आनंदात आहेत. मात्र या निर्णयामुळे ज्यांना पोटशूळ उठला आहे, त्यांना रडत बसूद्या. त्याला पर्याय नाही,” असे पडळकर म्हणाले आहेत.

Story img Loader