सांगली : शासन आपल्या दारी म्हणजे एक दिवसीय इव्हेंट असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत केली. बाजार समितीमधील विष्णुअण्णा खरेदीविक्री संघाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेस पक्षच सांगली लोकसभा लढवणार आणि आम्ही नक्की जिंकू. लोकसभा निवडणुकीचे दृष्टीने आम्ही पूर्वतयारी सुरु केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्याची परिस्थिती बिकट असून केवळ लोकाननुयी घोषणा केल्या जात आहेत. पण अंमलबजावणी होत नाही. लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम म्हणजे एक दिवसाचा इव्हेंट आहे. जातीय तणाव निर्माण करून त्याचा फायदा उठवला जातोय, आगामी निवडणुकीमध्ये फायदा करून घेण्यासाठी दंगलसदृष्य स्थिती निर्माण केली जात आहे.

घाऊकमध्ये पक्ष फोडण्याचे काम सध्या सुरु असून बहुमत असताना या फोडाफोडीची काय गरज? इतर पक्षातील लोक घेतल्याशिवाय लोकसभाला मतदान मिळणार नाही याची भीती वाटत असल्यानेच घाऊक पक्षफोडी सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची कुचंबणा सुरू झाली आहे. आपण भाजप सोबत का गेलो असा प्रश्न त्यांना सतावत असल्याचेही आ. चव्हाण यावेळी म्हणाले.