कर्जत: जान्हवी रवींद्र शेवाळे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार कर्जत तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी रवींद्र शेवाळे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार आज महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर झाला आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे अशी माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील, व प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांनी दिली आहे.
तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच जान्हवी शेवाळे यांनी सरपंच म्हणून ग्रामीण भाग असताना देखील गावामध्ये जी आदर्श काम केली. यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये शोषखद्दे,महिलांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे यासाठी त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांना डस्टबिन देऊन संक्रांतीचे अनोखी भेट दिली. यामुळे रस्त्यावर येणारा कचरा घरामध्ये साठवला गेला. आणि नंतर त्याचे संकलन करण्याचे काम झाले. यामुळे गाव स्वच्छ आणि सुंदर झाले. पर्यावरण राखण्यासाठी चांगले काम शेवाळे यांनी केले. याशिवाय
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी पाटेवाडी तलावा मधून एक कोटी ८७ लाख रुपये किमतीची जलजीवन योजना गावांमध्ये राबवली. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तसेच सिंचन क्षेत्र वाढीसाठी जलयुक्त शिवार योजनेमधून परिसरातील नदी मधील गाळ काढला याचा फायदा पाणीसाठ्यामध्ये परिसरामध्ये वाढ झाली आणि शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्रामध्ये देखील यामुळे वाढ झाली. याशिवाय परिसरामध्ये चार पाजर तलाव व ३०० नाला बंडिंग १७ दगडी व काँक्रीटचे नदीवरील बंधारे निर्माण केले.
संपूर्ण गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण व गावामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचे काम केले. याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे असणाऱ्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालय व सेवा संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पुढाकार घेऊन पूर्ण केले. ही सर्व विकासकामे विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे व ज्येष्ठ नेते एडवोकेट कैलास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने पूर्ण करण्यात आली. आणि या सर्व विकास कामांची दखल घेत त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे . शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, एकनाथ ढाकणे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह अहिल्यानगर या ठिकाणी या पुरस्काराची वितरण होणार आहे.
जान्हवी रवींद्र शेवाळे यांना आदर्श महिला सरपंच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे , एडवोकेट कैलास शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.