लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलिबाग : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्‍येष्‍ठ नेते प्रफुल्‍ल पटेल यांचया पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचे समर्थन केलं आहे. मराठा आरक्षणाचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न महायुतीच्या काळात मार्गी लागल्याबद्दल तटकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

माणगाव नगर पंचायतीच्‍या नवीन इमारत आणि शहराच्‍या नवीन पाणीपुरवठा योजनेच्‍या भूमिपूजन कार्यक्रमांनतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाच्‍या आरक्षणासंदर्भातील मागण्‍या सरकारने मान्‍य केल्‍यामुळे छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे. त्‍यावर बोलताना सुनील तटकरे यांनी म्‍हणाले की महायुतीच्‍या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्‍यासाठी वचनबदध होते. हे आरक्षण देताना ते कायद्याच्‍या कसोटीवर टिकणारे असावे अशी भूमिका होती. एकदा उच्‍च न्‍यायालयात आणि एकदा सर्वोच्‍च न्‍यायालयात आरक्षण रददबातल झाल्‍यामुळे आता कुठल्‍याही प्रकारची त्रुटी राहू नये याची पूर्ण खबरदारी घेण्‍यात आली आहे. आरक्षणासाठी कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. त्याचवेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही असंही स्पष्ट केलं. दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्‍न महायुतीच्‍या कार्यकाळात पूर्ण झाल्‍याबददल तटकरे यांनी समाधान व्‍यक्‍त केले.

आणखी वाचा-कारणं सांगू नका, माझ्या गतीनं कामं करा’, अजित पवार साताऱ्यात अधिकाऱ्यांवर संतापले

मराठा समाजाच्‍या आरक्षणासंदर्भातील मागण्‍या मान्‍य झाल्‍यानंतर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी खोचक टवीट केले होते त्‍यावरही त्‍यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाकडे कुठल्याच पक्षाने राजकीय दृष्टया पाहू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी या आरक्षणाचा निवडणुकीशी संबंध लावू नये. आज सरकारने जे आरक्षण दिलं आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं नाही. तर मराठा समाजाचा जो हक्क होता तो कायद्याच्या कसोटीवर कसा बसेल या प्रयत्नांचा भाग आहे, असं तटकरे यांनी स्पष्ट केले.