रेणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात उभारलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण व स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन सोमवारी (दि. ११) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
संग्रहालयात विलासराव देशमुख यांचे बालपण ते निर्वाणापर्यंतची छायाचित्रे आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यवरांच्या भेटी, नाटय़, कला, साहित्य आदी क्षेत्रांतील आठवणी यात आहेत. दुसऱ्या दालनात सुमारे दीड हजार चलचित्रे असून चित्रांबद्दलची माहिती ऐकता येईल. तिसऱ्या दालनात निवडक भाषणांचे संकलन ऐकायला मिळेल. पुण्याचे परदेशी आर्ट यांनी तयार केलेला हा पुतळा १० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा व एक टन वजनाचा आहे, अशी माहिती रेणा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील व उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. आमदार वैजनाथ िशदे, कार्यकारी संचालक ए. आर. चव्हाण, संचालक लालासाहेब चव्हाण, गणपतराव माने आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, मधुकरराव चव्हाण, सतेज पाटील, अमित देशमुख आदी मंत्रिगण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार बसवराज पाटील, बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा