छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने यवतमाळ मधील आर्णी येथील एका तरुणाने आपल्या घरावरच पाच फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. आदर्शवत संकल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या सचिन भोयर याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असाच आहे.

सचिन भोयर यांचे हे आर्णी येथील रहिवासी असून, लहान पणापासून शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगिकारले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर बांधते वेळी त्यांनी पाच फुट उंचीचा शिवरायांचा पुतळाही आपल्या घरावर बसवला आहे. त्यांच्या संकल्पनेचे आणि कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Agriculture Department prepared for Rabi season in district preparing agriculture in Konkan region for second time after paddy harvest
जिल्ह्यात ५ हजार ६८२ हेक्टरवर रब्बीचे नियोजन, २ हजार ९४० हेक्टरवर कडधान्यांची लागवड
Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
Bal Shivaji Park, Marathi Bhavan, Ulhasnagar,
उल्हासनगरात बाल शिवाजी उद्यान, महिला, मराठी भवन; उल्हासनगरच्या बोट क्लबचेही सुशोभीकरण होणार, निधी मंजूर
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

उद्या (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवमहोत्सवदेखील साजरा केला जात आहे. परंतु, सचिन भोयर हे केवळ एकच दिवस नाही तर वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नियमत पूजन करतात आणि त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतात. पुतळ्यांवरून राज्यात अनेक ठिकाणी राजकारणही होताना दिसते. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा उभारावा. तरुणाईने छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन सचिन भोयर यांनी केले आहे.

वादविवाद न करता प्रत्येकाने आपल्या राजाचा पुतळा घरीच बसवावा –

छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातीचे होते. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असाच आहे. घरी बसविलेल्या पुतळ्याचे मी रोज पुजन करतो. त्यानंतरच आपल्या कामासाठी बाहेर पडतो. पुतळ्यासाठी वादविवाद न करता प्रत्येकाने आपल्या राजाचा पुतळा घरीच बसवावा. असं सचिन भोयर सांगतात.

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करावे –

शिवाजी महाराजांचा पुतळा घरावर बसविला आहे. पुजनेनंतरच सचिन भोयर आपल्या कामाला सुरुवात करतात. सर्वांनी पुतळ्यावरून राजकारण न करता आपल्या घरावरच पुतळा बसवावा. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करावे, असा संदेश पुतळा उभारून सचिन भोयर यांनी दिला आहे. असे आर्णीचे रहिवासी सुरेश वडपल्लीवार यांनी म्हटले आहे.

Story img Loader