भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगडाने हल्ला केला आहे. खासदार बोंडे एका बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, यावेळी अचानक त्यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. यामध्ये बोंडे यांच्या डाव्या खाद्यांला इजा झाली असून काही प्रमाणात सूज आली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून ते घरीच डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘टीव्ही ९ मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमरावतीच्या तिवसा शहरात मागील तीन दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी या कार्यक्रमाचा अखेरचा दिवस होता. भाजपा खासदार अनिल बोंडेही या बैलगाडा शर्यतीला उपस्थित होते. यावेळी गर्दीतून तीन-चार दगड त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आले. यातील एक दगड अनिल बोंडेंच्या खांद्याला लागला. यामध्ये त्यांच्या डाव्या खाद्यांला दुखापत झाली असून काही प्रमाणात सूज आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- “३ डिसेंबरनंतर देशात कुठे ना कुठे नरसंहार…”, निवडणूक निकालावरून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

हे दगड नेमके कुणी मारले आणि का मारले? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. शिवाय घटनास्थळी अनेक शेतकरी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते, त्यामुळे दगड कुणी भिरकावले हेही कळू शकलं नाही. याप्रकरणी अनिल बोंडे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.