नांदेड : ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांच्या वाहनाची काच दगडफेक करून फोडण्यात आली. ही घटना लोहा मतदारसंघातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथे गुरुवारी रात्री घडली. मराठा तरुणांनी प्रा. हाके यांचे वाहन फोडल्याचा आरोप असून, घटनेनंतर मराठा व ओबीसी असे दोन गट आमनेसामने आल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला.

प्रा. हाके यांनी ओबीसी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी ठिय्या मांडला. या वेळी ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. प्रा. हाके यांनी दगडफेक करणाऱ्यांनी समोर येऊन लढण्याचे आव्हान दिले. सध्या बाचोटी येथे पोलीस बंदोबस्त  तैनात आहे.

Story img Loader