सोलापूर : सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद संपतासंपेना असे चित्र आहे. सोमवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आघाडीचा धर्म पाळण्याचा इशारा दिलेला असतानाच आज काँग्रेस आणि डाव्या पक्षातील मतभेदाने टोक गाठले. शहर मध्य मतदारसंघात काँग्रेससह माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम हेही उमेदवार असून आघाडीतील वादातून त्यांच्या घरावर आज दगडफेकीचा प्रकार घडला. हे कृत्य प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करत आडम यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. दारूच्या नशेतील या कार्यकर्त्यांनी आडम यांच्या घरावर दगडफेक करत गोंधळ घातला आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपचे देवेंद्र कोठे, एमआयएम पक्षाचे फारुख शाब्दी आणि माकपचे अनुभवी नेते नरसय्या आडम यांच्यात चौरंगी लढत होत आहे. डाव्या आघाडीकडून या जागेची मागणी होत होती. मात्र, ती न सुटल्याने डावे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यात आडम यांनी नुकताच खासदार प्रणिती शिंदे यांनी आपला केसाने गळा कापल्याचा आरोप केला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर अमोल मिटकरींनी मागितली माफी
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Nitin Gadkari chopper checked
Nitin Gadkari: उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींचीही तपासणी; हेलिकॉप्टर तपासणीचा व्हिडीओ आला समोर

हेही वाचा >>>गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना

या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना रात्री लष्कर भागातील बापूजी नगरात आडम यांच्या घरावर अचानकपणे दगडफेक झाली. हे कृत्य काँग्रेसच्या आठ कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आडम यांनी केला आहे. दगडफेक का केली, असे विचारत असताना संबंधित समाजकंटकांनी आडम कुटुंबीयांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोपही आडम यांनी केला आहे. नंतर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणल्याचे माकपचे जिल्हा सचिव एम. एच. शेख यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Nitin Gadkari: उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींचीही तपासणी; हेलिकॉप्टर तपासणीचा व्हिडीओ आला समोर

या घटनेमुळे आडम व त्यांच्या कुटुंबीयांसह सहकारी कार्यकर्त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आडम हे कोणत्याही संरक्षणाशिवाय जनतेत खुलेआम आणि जनतेसाठी काम करीत असतात. त्यामुळे आडम यांना कायदेशीर संरक्षण देऊन संबंधित समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

काँग्रेसने हात झटकले

तथापि, आडम यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नाही. केवळ राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी आडम हे खोटा आरोप करीत आहेत, असा खुलासा काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे यांनी केला आहे.