राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात कार उभी असताना अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची कार जिल्हा बँकेच्या आवारात उभी होती. तेव्हा अज्ञातांनी कारच्या समोरील काचेवर दगडफेक केली. तसेच, कारवर ऑइलही फेकलं आहे.

याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. राजेश टोपे म्हणाले, “लोणीकरांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या आवारात आणि माझ्या कारवर दगडफेक केली आहे. यात कारची समोरील काच फुटली आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्य आहे.”

Story img Loader