सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एका धावत्या ट्रेनच्या आतून काढलेला हा व्हिडीओ असून त्यात प्रवाशांची भीतीनं झालेली धावपळ स्पष्टपणे जाणवत आहे. हा व्हायरल व्हिडीओ भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनमधला असल्याचं सांगितलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.

काय आहे हा व्हायरल व्हिडीओ?

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनमधील प्रवाशी भीतीनं एकमेकांना खिडक्या लावून घ्यायची विनंती करताना ऐकू येत आहेत. एका महिलेचाही आवाज येत असून “दगडफेक चालू झाली आहे.. अरे बापरे.. काका खिडकी खाली करा ना लवकर”, असं सदर महिला एका सहप्रवाशाला सांगत असल्याचंही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. ट्रेनच्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य दिसत असून माणसांचा एक मोठा घोळका जमा झाल्याचं दिसून येत आहे. याच घोळक्यातल्या काहींनी रेल्वेवर अचानक दगडफेक सुरू केली आणि आतल्या प्रवाशांची धावपळ झाली. खिडकीतून आत येणाऱ्या दगडांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी रेल्वेच्या डब्यातल्या प्रवाशांनी तातडीने इतरांना खिडक्या बंद करण्यास सांगितलं.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Attempted of assassination plot iron strip railway track Atgaon Tanshet railway stations
आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
Vande Bharat sleeper
Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत स्लीपर ट्रेनने गाठला १८० किलोमीटर प्रतितास वेग; चाचणीचा Video आला समोर
passenger beaten to death on dakshin express
धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून

इथे पाहा दगडफेकीचा व्हायरल व्हिडीओ!

रेल्वे पोलिसांची तातडीने कारवाई

दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर घडला प्रकार उघड झाला. यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रवाशाने तक्रार दाखल केलेली नसून रेल्वे पोलिसांनी स्वत:हून या प्रकाराची दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी रेल्वे कायदा कलम १५४ अनुसार अज्ञात आरोपींविरोधात प्रवशांच्या जीविताला धोका निर्माण करणारं कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

SpiceJet च्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; धक्कादायक Video व्हायरल!

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने या वृत्तामध्ये प्रवाशांच्या प्रवासाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. शुक्रवारी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनने मोठ्या संख्येनं प्रवासी भोरतकच्या दिशेनं एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते, असा दावा केला जात आहे. तसेच, या ट्रेनमध्येही काही आरपीएफचे जवान उपस्थित होते, असंही सांगितलं जात आहे. यासंदर्भात अंमळनेर जीआरपीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Story img Loader