सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एका धावत्या ट्रेनच्या आतून काढलेला हा व्हिडीओ असून त्यात प्रवाशांची भीतीनं झालेली धावपळ स्पष्टपणे जाणवत आहे. हा व्हायरल व्हिडीओ भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनमधला असल्याचं सांगितलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे हा व्हायरल व्हिडीओ?

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनमधील प्रवाशी भीतीनं एकमेकांना खिडक्या लावून घ्यायची विनंती करताना ऐकू येत आहेत. एका महिलेचाही आवाज येत असून “दगडफेक चालू झाली आहे.. अरे बापरे.. काका खिडकी खाली करा ना लवकर”, असं सदर महिला एका सहप्रवाशाला सांगत असल्याचंही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. ट्रेनच्या खिडकीमधून बाहेरचं दृश्य दिसत असून माणसांचा एक मोठा घोळका जमा झाल्याचं दिसून येत आहे. याच घोळक्यातल्या काहींनी रेल्वेवर अचानक दगडफेक सुरू केली आणि आतल्या प्रवाशांची धावपळ झाली. खिडकीतून आत येणाऱ्या दगडांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी रेल्वेच्या डब्यातल्या प्रवाशांनी तातडीने इतरांना खिडक्या बंद करण्यास सांगितलं.

इथे पाहा दगडफेकीचा व्हायरल व्हिडीओ!

रेल्वे पोलिसांची तातडीने कारवाई

दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ चर्चेत आल्यानंतर घडला प्रकार उघड झाला. यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रवाशाने तक्रार दाखल केलेली नसून रेल्वे पोलिसांनी स्वत:हून या प्रकाराची दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी रेल्वे कायदा कलम १५४ अनुसार अज्ञात आरोपींविरोधात प्रवशांच्या जीविताला धोका निर्माण करणारं कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

SpiceJet च्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; धक्कादायक Video व्हायरल!

पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने या वृत्तामध्ये प्रवाशांच्या प्रवासाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. शुक्रवारी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनने मोठ्या संख्येनं प्रवासी भोरतकच्या दिशेनं एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते, असा दावा केला जात आहे. तसेच, या ट्रेनमध्येही काही आरपीएफचे जवान उपस्थित होते, असंही सांगितलं जात आहे. यासंदर्भात अंमळनेर जीआरपीला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone pelting on bhusawal nandurbar passenger train viral video in jalgao pmw