सोलापूर : जम्मू-काश्मीरच्या पहेलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे सत्र सोलापुरात सुरू आहे.शहरात नवी पेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने सकाळी सर्व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर एकत्र येऊन क्रूर दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. बलिदान दिलेल्या सर्व मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, मोहन बारड, खुशाल देढिया, रमण अग्रवाल, विजय पुकाळे, प्रकाश आहुजा, विश्वजीत मुळीक व इतरांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

करमाळा शहरात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व मशिदींमध्ये हाताला काळ्या रंगाच्या कापडी पट्ट्या बांधून नमाज अदा केली. सकल मुस्लिम समाजाचे जमीर सय्यद, जामा मशिदीचे मौलाना अनवर, मक्का मशिदीचे मौलाना सिकंदर, सुलेमानी मशिदीचे मौलाना मोहम्मद फारुख रझा, आयेशा मशिदीचे मौलाना अबू रेहान यांच्यासह रमजान बेग, झाकीर वस्ताद, ऑफिस अब्दुल्ला सरफराज पठाण, समीर बागवान आदींचा या निषेध आंदोलनात सहभाग होता.

अक्कलकोटमध्ये भाजप अल्पसंख्याक सेलकडून पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात फैजअहमद कोरबू, मोहसीन बागवान, हुसेन मुजावर, सैफन पठाण, हुसेन बळोरगी, सरफराज विजापुरे, बुढन तांबोळी, गौस इनामदार, सलीम गवंडी आजींचा सहभाग होता.