सुनील केंद्रेकर यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदावरून बदली करण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संपूर्ण बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बीडमधील सर्व मुख्य व्यवहार ‘बंद’ ठेवण्यात आले आहेत. शहरातील बाजारपेठही बंद असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतल्याचे चित्र दिसते आहे. केंद्रेकर यांची बदली झाल्याचे कळताच गुरुवारपासून स्थानिकांती तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसवगळता सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
केंद्रेकर यांच्या जागी नवलकिशोर राम यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला. केंद्रेकर यांची औरंगाबादला सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रशासनात पारदर्शकता आणण्यात केंद्रेकर यशस्वी ठरले होते. त्यांनी दुष्काळाच्या नावाखाली सुरू असलेले अनावश्यक टॅंकर बंद केले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी चारा छावण्यांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. यापूर्वीही केंद्रेकर यांची बदली करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केल्यानंतर बदली मागे घेण्यात आली होती.
केंद्रेकरांच्या बदलीच्या निषेधार्थ बीडमध्ये कडकडीत ‘बंद’
सुनील केंद्रेकर यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदावरून बदली करण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संपूर्ण बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
आणखी वाचा
First published on: 29-11-2013 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike in beed over transfer of collector sunil kendrekar