सुनील केंद्रेकर यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदावरून बदली करण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संपूर्ण बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बीडमधील सर्व मुख्य व्यवहार ‘बंद’ ठेवण्यात आले आहेत. शहरातील बाजारपेठही बंद असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतल्याचे चित्र दिसते आहे. केंद्रेकर यांची बदली झाल्याचे कळताच गुरुवारपासून स्थानिकांती तीव्र संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसवगळता सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
केंद्रेकर यांच्या जागी नवलकिशोर राम यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला. केंद्रेकर यांची औरंगाबादला सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रशासनात पारदर्शकता आणण्यात केंद्रेकर यशस्वी ठरले होते. त्यांनी दुष्काळाच्या नावाखाली सुरू असलेले अनावश्यक टॅंकर बंद केले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी चारा छावण्यांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. यापूर्वीही केंद्रेकर यांची बदली करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केल्यानंतर बदली मागे घेण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा