कोणत्या मास्तरांनी कान पिळायचा हे मला ठरवता आले नाही. त्यामुळे आपल्याला नको असलेली मंडळी असली तरी आहे त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेणे हेच विद्यार्थ्यांचे काम आहे. म्हणूनच संप करून ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे विद्यार्थी आपलेच नुकसान करून घेत आहेत, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी संपकर्त्यां विद्यार्थाचे शनिवारी कान टोचले. वेळ वाया घालवू नका. लवकर तोडगा काढून कामाला लागा आणि अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना
दिला.

Story img Loader